शिराळा बिरोबा मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला

 

शिराळा/प्रतिनिधी-:      

             लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री-पुरुष समानता, गोरगरीब विषयी कळवळा व तळमळ असे मोठे कृतिशील कार्य केले असून या कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

      शिराळा बिरोबा मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शुभहस्ते  करण्यात आला


यावेळी नाईक बोलत होते.


      नाईक म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांनी केलेले कार्याचा संपूर्ण भारत गौरव करत असून सर्वच जाती-धर्माच्या प्रगतीसाठी अहिल्याबाई होळकरांचे मोठे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे मार्गदर्शक खाली महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष  राजेंद्र उर्फ चिमण भाऊ डांगे यांनी राज्यातील संपूर्ण धनगर समाजाला एकत्रित करून आपल्या न्याय हक्कासाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. आज शिराळा तालुक्यातील मोरणा नदी येथील सर्वांना परिचित असलेले बिरोबा मंदिरापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचा शुभारंभ होत आहे हे शिराळातालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मोरणा नदीच्या काठावर वसलेल्या बिरोबा मंदिरासाठी सुशोभीकरण, भक्तनिवास, दिशादर्शक वेशकमान ,रस्ते आदी विकास कामे करण्यामध्ये आपल्याला यश आले आहे. भविष्यातील बिरोबा मंदिराच्या व्यापक विकास कामाचा २ कोटी रुपयाचा आराखडा बनवून  आमदार मानसिंगराव नाईक व आम्ही पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यामधे एक अग्रेसर बिरोबा मंदिर म्हणून नावारूपाला येण्यासाठी नियोजन करत आहोत.

     यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. अहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेच्या रथाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक संपर्क कार्यालय शिराळा येथे स्वागत करण्यात आले. ही रथयात्रा शिराळा येथिल शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून सोमवार पेठ गुरुवार पेठ देशमुख गल्ली एसटी स्टँड अशा मार्गाने प्रयाण झाले. तर सुखदेव पाटील, सांगली माजी महापोर संगीता खोत ,प्राध्यापक अरुण घोडके, सर्जेराव ठकरे, शंकर गावडे, आनंद गावडे, विश्वास कदम, उत्तम  बंडा डांगे, बजरंग कदम,सागर नलवडे, कुंडलिक नाना येडगे, विलास कोळंबाग, कल्पना कोळेकर, नगरसेविका सांगली स्मिता यमगर , एस वाय यमगर, बंडा यमगर, पांडुरंग येडगे ,रुक्मिणी येडगे, सुनील लोहार, सत्यवान लोहार, गणेश सुतार ,शंकर शिंदे, सुरेखा शिंदे, इंद्रजीत यमगर आदी मान्यवरांसह विविध गावचे सरपंच व शिराळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते.

    फोटो ओळ -: शिराळा बिरोबा मंदिर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेचा शुभारंभ करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक , आमदार मानसिंगराव नाईक, राजेंद्र उर्फ चिमण डांगे आदी मान्यवर