राजारामबापू'च्या ऊस रोपवाटिकेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- प्रदीपकुमार पाटील,अतुल पाटील

 इस्लामपूर दि.१० प्रतिनिधी

      ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुद्ध व पायाभूत बियाण्यांचा पुरवठा करून त्यांचे उसाची एकरी उत्पादन वाढवण्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून ऊस रोपवाटिका उपक्रम सुरू केला आहे. त्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भावना जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,संचालक अतुल पाटील यांनी व्यक्त केली. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणी, मल्टीस्पेक्ट्रम ड्रोन कॅमेरा,ठिबक सिंचन आदी अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असल्या चेही त्यांनी सांगितले.

       कारंदवाडी (ता.वाळवा) व तिप्पेहळळी (जत) युनिटच्या रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. संचालक देवराज पाटील,विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील,बबनराव थोटे,प्रताप पाटील, सौ.मेघा पाटील,डॉ.योजना शिंदे-पाटील, शैलेश पाटील,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,कामगार नेते शंकरराव भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारंदवाडी युनिटमध्ये संचालक प्रदीपकुमार पाटील यांच्या हस्ते,तर तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये संचालक अतुल पाटील यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

     प्रदीपकुमार पाटील म्हणाले,आपण बऱ्याच वर्षांपूर्वी बियाणे मळा सुरू करून शेतकऱ्यांना शुध्द बियाणे पुरवठा करीत आहोत. मात्र गेल्या चार वर्षापासून ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. पहिल्या वर्षी २ लाख ९६ हजार,दुसऱ्या वर्षी ७ लाख २ हजार,तर गेल्या वर्षी ८ लाख ६१ हजार रोपांचा पुरवठा केला आहे. यावर्षी १० लाख रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.

       अतुल पाटील म्हणाले,आम्ही २०२१ पासून राजाराम मल्टी मॅक्रो न्यूट्रियट व राजाराम मल्टी मायक्रो न्यूट्रियट ही द्रव्यरुप खते निर्मिती करीत आहोत. मॅक्रो न्यूट्रियट मधून एन पी के,तर मायक्रो न्यूट्रियट मधून सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना मिळून उत्पादन वाढीस मदत होते.

     माजी संचालक विराज शिंदे,माणिक शेळके,संचालक हणमंत माळी,राजकुमार कांबळे,दिलीपराव देसाई,अमरसिंह साळुंखे, रामराव पाटील,वैभव वसंतराव रकटे, कामगार संचालक विकास पवार,मनोहर सन्मुख,तानाजीराव खराडे,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,विजय मोरे,संग्राम चव्हाण, उमेश शेटे,सुदाम पाटील,नंदकिशोर जगताप, महेश पाटील,शेती अधिकारी हणमंत धारी गौंड यांच्यासह सभासद,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


फोटो ओळी- कारंदवाडी युनिटमध्ये रोलर पूजनप्रसंगी प्रदीपकुमार पाटील,रमेश हाके, वैभव रकटे,मेघा पाटील,डॉ.योजना पाटील, अमरसिंह साळुंखे,रामराव पाटील,तसेच संचालक व अधिकारी.