वांगीत आ.माजी मंत्री विश्वजित कदम भजनात दंग

वांगीत आ.माजी मंत्री विश्वजित कदम भजनात दंग 


वांगीत आषाढ़ी एकादशीच्या भजन सोहळ्यात घेतला सहभाग


कडेगाव 

   वांगी ता.कडेगाव येथे आ.माजी मंत्री विश्वजित कदम भजनात दंग झाल्याचे पाहयला मिळाले त्यांनी आषाढ़ी एकादशीच्या भजन सोहळ्यात सहभाग घेतला 

    वांगी ता.कडेगाव येथे दर वर्षी   पारंपरिक पध्दतीने गावचे प्रथम नागरिक सरपंच वंदना सूर्यवंशी व बाबासाहेब सूर्यवंशी व गावातील वारकरी दत्ता मोहिते व वंदना मोहिते यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा संपन्न होत असते त्यानंतर विविध भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या आषाढ़ी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आ.विश्वजित कदम यानी हजेरी लावली होती यावेळी त्या ठिकाणी चालू असलेल्या भजनामध्ये आ.विश्वजित कदम यानी सुध्दा टाळ घेऊन भजनामध्ये दंग झाल्याचे चित्र पाहयला मिळाले समतेचा पायीक असणारा विठ्ठल बळीराजावरील सर्व संकटे दुर करून बळीराजाच्या घरी धन धान्य समृद्धि आणो हि प्रार्थना आ.विश्वजित कदम यांनी यावेळी केली 

    चालु असलेल्या भजनामध्ये आ.विश्वजित कदम अवघे हरिनामामध्ये दंग होऊन तल्लीनतेने भजनामध्ये दंग झाल्याचे पाहयला मिळाले यावेळी गावातील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने भजनात तल्लीन झाले होते