गेले सहा दिवस आष्टा नगर परिषदेतील भ्रष्टाचारा विरुद्ध सुरू असलेले व अमरण उपोषण अखेर लेखी आश्वासन नंतर स्थगित

 वाळवा क्रांती आष्टा

गेले सहा दिवस आष्टा नगर परिषदेतील भ्रष्टाचारा विरुद्ध सुरू असलेले व अमरण उपोषण अखेर चोवीस तासाच्या आत निधीची रक्कम जमा करण्याच्या लेखी आश्वासन नंतर स्थगित करण्यात आले यावेळी इस्लामपुर प्रांत अधिकारी प्रदीप खिल्लारे व निशिकांत दादा पाटील व मुख्याधिकारी कैलास चव्हाण  यांनी आंदोलनकर्ते प्रवीण माने व दिलीप कुरणे यांना लिंबू सरबत पाजले.

यावेळी निशिकांत दादा पाटील म्हणाले आष्टा नगर परिषदेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्तीत कामे न करता त्या कामांचे लाखो रुपयांचे बिल आदा करण्यात आले आहेत तसेच अनेक कामात  भ्रष्टाचार झालेला आहे  भ्रष्टाचारामध्ये ठेकेदार, अभियंता, सह इतर लोकांच्या वर गुन्हे दाखल करावे व बगीचा कामाचा निधी वसुल करावा म्हणून  भारतीय जनता पार्टी आष्टा व डेमोक्रॅटिक पार्टी आँफ इंडिया व निशिकांत दादा युथ फाउंडेशनच्या वतीने आष्टा नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू होते   प्रशासनाच्यावतीने संबंधितावर गुन्हा दाखल केला गेलेला नाही म्हणून  गुढीपाडव्याच्या दिवशी काळी गुढी उभा करून निषेध केला गेला  तसेच सोमवारी गाव बंद आंदोलन करण्यात आले येथून पुढेही आस्था नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व घोटाळा आम्ही जनतेसमोर आणणार आहोत 

यावेळी प्रविण माने,दिलीप कुरणे,डॉक्टर सतीश बापट शिवसेनेचे राकेश आटुगडे, नंदकुमार आटुगडे, स्वाभिमानीचे गुंडा भाऊ आवटी,  संदीप सावंत ,पिंटु ढोले, उदय कवठेकर, आरबाज मुजावर, जिनगौड पाटील, रविराज चव्हाण, अविनाश काळोखे, रोहित आटुगडे, शोएब सनदे, चंद्रकांत पाटोळे, अनिकेत खोत, रोहित घस्ते,गौरव दमामे,समिर पटवेगार, पृथ्वीराज घटुगडे, साजिद पटवेगार  यांच्यासह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आष्टा पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.




Popular posts
डॉ.पूनावाला स्कूलतर्फे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
Image
आष्टा शहरात भाजपाचे हुकूमशाही चालून देणार नाही - शिवाजीराजे चोरमुले
Image
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बड्या धेंडाना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर चालविण्याचा विचित्र प्रकार सुरू आहे सांगली येथील जिल्हा बँकेच्या पुष्प राज चौकातील मुख्य कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे
इस्लामपूर येथे टाटा CURV या इलेक्ट्रिक कारचे मा.राहुल महाडिक (दादा) यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न.
Image
पुन्हा तोच जल्लोष.. पुन्हा तोच उत्साह महाडीक्युवाशक्ती,वनश्री युथ फौडेशन, मंचलित महाडिक युवाशक्ती दहीहंडी उत्सव 2022