वांगी येथील स्वातंत्र्य सेनानी निकम यांचे कुटुंब संपविण्याचा डाव घराच्या दरवाज्याला दिला विजेचा करंट

 वांगी येथील स्वातंत्र्य सेनानी  निकम यांचे कुटुंब संपविण्याचा डाव घराच्या दरवाज्याला दिला विजेचा करंट                

वाळवा क्रांती / वांगी


   वांगी (ता. कडेगाव) येथील स्वातंत्र्यसेनानी दिवंगत शंकरराव निकम यांच्या कुटुंबाला अज्ञात हल्लेखोरानी विजेचा झटका देऊन मारण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांचे नातू व सामाजिक कार्यकर्ते  सुरज निकम यांनी याबाबत चिंचणी वांगी पोलिसांची संपर्क साधला आहे.        याबाबत मिळालेली माहिती अशी की   मंगळवारी रात्री बारा ते दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सुरज निकम व त्यांचे आई-वडील भाऊ राहत असलेल्या शेतातील घराला ताराचा विजेचा झटका देण्याचा प्रयत्न केला. निकम यांच्या घराजवळ असलेल्या  अकरा केव्हीचा टान्सफार्मर मधून तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूच्या दाराच्या कड्याला अडकवण्यात आल्या होत्या. नायलानच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावर या तारांचे नियंत्रण ऊस पिकात करण्यात आले होते. ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची व तार खेचण्याची   अज्ञात हल्लेखोर  यांनी त्याची जोडणी केली होती. रात्री दीडच्या सुमारास  अज्ञात हल्लेखोरारनी हा दोर खेचताच  तारावर अचानक लोड येऊन 11 केव्ही ट्रान्सफार्मरवर जवळ स्फोट होऊन जाळ झाला मोठ्या स्फोटाच्या आवाजाने व आगीमुळे निकम कुटुंब जागे झाले दरवाजा उघडला  याच स्फोटामुळे वीज ट्रान्सफार्मर वरील  विजप्रवाह बंद झाला.  सुदैवाने घराबाहेर पडून  त्यांना विजेचा धक्का बसला नाही काही वेळाने वीज पूर्ववत  आल्यावर निकम यांच्या मातोश्रींना हलकासा  विजेचा झटका जाणवला मात्र पुन्हा तारा ट्रिप  झाल्या. निकम कुटुंबीयांनी सावध पवित्रा घेत हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्याना जाणवल्याने तातडीने बचावच्या हालचाली केल्या. यादरम्यान काही लोक मोठमोठ्याने बोलत असल्याचे व पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे निदर्शनास आले होते.ते लोक  कोण  होते माहित नव्हते याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही.             सुरज निकमशी संपर्क साधला असता आपण अधिकृतरित्या याबाबत चिंचणी वांगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले

Popular posts
डॉ.पूनावाला स्कूलतर्फे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
Image
आष्टा शहरात भाजपाचे हुकूमशाही चालून देणार नाही - शिवाजीराजे चोरमुले
Image
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बड्या धेंडाना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर चालविण्याचा विचित्र प्रकार सुरू आहे सांगली येथील जिल्हा बँकेच्या पुष्प राज चौकातील मुख्य कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे
इस्लामपूर येथे टाटा CURV या इलेक्ट्रिक कारचे मा.राहुल महाडिक (दादा) यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न.
Image
पुन्हा तोच जल्लोष.. पुन्हा तोच उत्साह महाडीक्युवाशक्ती,वनश्री युथ फौडेशन, मंचलित महाडिक युवाशक्ती दहीहंडी उत्सव 2022