आष्टा येथील रायगड पतसंस्थेची वार्षीक सभा उत्साहात
वाळवा क्रांती / आष्टा
आष्टा ता.वाळवा येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या रायगड नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा संस्थेच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री संभाजी सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संप्पन्न झाली.कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतीमा पुजन व दिपप्रज्वलन करून झालेनंतर स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री संभाजी सुर्यवंशी यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या वाढत्या आर्थीक प्रगतीचा आढावा घेवून सभासदांना १०% डिव्हीडंड जाहीर केला.यानंतर संस्थेचे संचालक मा श्री जयकुमार रुकडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.अहवाल वाचन संस्थेच्या व्हा.चेअरमन मा.सौ सारीका इटकरकर यांनी केले.संस्थेचे सचिव मा.किरण गायकवाड यांनी विषयपत्रीकेचे वाचन केलेनंतर सभेपुढील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देणेत आली.या सभेवेळी कृषी,धार्मिक,सामाजिक,व्यापार व उद्योग,कला,साहित्य,शैक्षणीक या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देवून गौरव व सत्कार करण्यात आला.आभार संस्थेचे संचालक मा.श्री सदानंद तोडकर यांनी मानले.
या सभेसाठी आष्टा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष मा.श्री प्रभाकर जाधव,संस्थेचे संचालक मा.श्री शिवाजी डांगे,मा.श्री सुनिल माने,मा.श्री आप्पासो नायकवडी,मा.श्री तुषारराजे सुर्यवंशी,मा.सौ राधीका कदम,मा.श्री संदीप पोळ,मा.श्री लालासो ढोले,मा.श्री संजय इटकरकर,शिवशांती उद्योग समुहाचे संस्थापक चेअरमन मा.पै.श्री हणमंत सुर्यवंशी,संस्थेचा सेवक वर्ग तसेच संस्थेचे सभासद,हितचिंतक,सत्कारमुर्ती, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

