आष्टा पोलीसांकडून मास्कचा वापर न करता विनाकारण फिरणारे २१ वाहनचालकांवर कारवाई

 


सध्या कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता मा जिल्हाधिकारीसाो, सांगली यांनी नागरिकांना कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना तिनपदरी मारक किंवा साधा कापडी मारक किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करणेत येत आहे असे आदेश पारित केले आहेत. तसेच सांगली जिल्हा स्थल सिमा हद्दीत फौजदारी प्रक्रीया संहीता कलम ?1४४ प्रमाणे संचारबंदी आदेश लागू केला आहे. असे असताना सुध्दा काही नागरीक कोरोणा विषाणू रोगांचा संसर्ग पसरविण्याचा धोका असुन सुध्दा स्वत: चे तसेच इतरांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे आपले नाक व तोंडावर मास्क न लावता वाजवी कारणाशिवाय विनाकारण मोटारसायकल वरुन फिरतात.मा पोलीस अधीक्षकसो श्री सहेल शर्मासाो. मा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री कृष्णात पिंगळे सो यांचे मार्गदर्शनाखाली आष्टा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री भानुदास निभोरे, सपोनि श्री समीर ढोरे, पोउपनि श्री दीपक सदामते, पोह राजेंद्र पाटील, अवधुत भाट, राजेंद्र जंगम, अभिजित धनगर, सपोफौ कुंभार, पोना मल्हारी खाडे, हणमंत गवळी यांनी आष्टा शहरात मा जिल्हाधिकारीसाो सांगली यांचे आदेशाची कडक अंमलबजावणी करीत इसम नामे १. संदीप विद्याधर आवटे, वय ४४ वर्षे रा. आष्टा २. युवराज कृष्णा कोळी, वय ३१ वर्षे, रा. कोळी गल्ली, आष्टा ३. बिपीन बाबासाहेब देशमुख, वय ३५ वर्षे, रा. प्राध्यापक कॉलनी, गांधीनगर, आष्टा ४. भरत भूपाल कवठेकर, वय ४३ वर्षे, रा. कोटेश्वर रस्ता, आष्टा ५. मंगेश रमेश चाकळे वय २४ वर्षे, रा. सुर्यगांव कमानीच्या आत, पलूस, ६) सदाशिव गणपत निकाळजे, वय ३८ वर्षे, रा. संस्कार लॉज जवळ, भिलवडी रस्ता, आष्टा, ७) विलास भाटू जाधव, वय २५ वर्षे, रा. संस्कार लॉज जवळ, भिलवडी रस्ता, आष्टा, ८. उत्तम ज्ञानू कोळी, वय ४२ वर्षे, रा. कारंदवाडी, ९. महेश विष्णू म्हेत्रे, वय ३० वर्षे, रा. रोझावाडी, बागणी, १०. बर्धमान विशाल कुंबळे, वय १९ वर्षे, रा.कदमवेस, आष्टा, ११. संदीप राजाराम खोत, वय ३५ वर्षे, रा. मिरजवाडी, मराठी शाळेजवळ, १२.यशवर्धन पृथ्वीराज थोरात, वय १९ वर्षे, रा. नगरपालीके पाठीमागे, आष्टा १३. दिपक शामराव आवटी, वय ४० वर्षे, रा. गांधीनगर, दुधगाव रस्ता, आष्टा १४. सागर सदाशिव माने, रा. धनगर गल्ली, आष्टा १५. अमित अजित मालगांवे, वय २७ वर्षे, रा. मालगांवे रोपवाटीका, आष्टा १६. दिलीपकुमार शिवलिंग कोरे, रा. मालगांचे दवाखान्या समोर, आष्टा १७. संकेत दत्तात्रय खिलारे, वय २० वर्षे रा. चव्हाणवाडी, आष्टा १८. प्रकाश चंद्रकांत मोरे, वय ४८ वर्षे रा. गांधीनगर, आष्टा १९. ज्योतीराम रामचंद्र वाईगडे, वय ३८ वर्षे रा. वसंतनगर, तुंग, २०. दिपक प्रल्हाद पाटील, वय ४० वर्षे रा. ग्रामपंचायत जवळ, बागणी, २१.सचिन अशोक पाटील, वय ३५ वर्षे रा. नागाव रोड, पोखर्णी, यांचे विरुध्द गुन्हे दाखल करुन कारवाई केली आहे. तरी नागरीकांनी मास्कचा वापर करावा, विनाकारण मोटारसायकलीवरुन रस्त्यावरुन फिरु नये, संचारबंदी आदेशाचा भंग करुन नये सदरची कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे असे आवाहन पोलीस निरिक्षक श्री भानुदास निंभोरे यांनी केले आहे.